न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२३) :- रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने पिंपरीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष धम्मराज साळवे व पोलीस उपनिरीक्षक सावन वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंचचे संतोष शिंदे, नीरज भालेराव, रोहित कांबळे, संदेश पिसाळ, श्वेता ओव्हाळ, भाग्यश्री आखाडे, प्रणाली कावरे, स्नेहल म्हसकर, महेश गायकवाड, मयूर जगताप, योगेश कांबळे, समाधान गायकवाड, निलेश आठवले, राहुल थोरात आदी उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक सावन वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. आज सर्वानी याच संविधानाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःच्या व देशाच्या प्रगतीचा मार्ग निश्चित करू शकतो, असे मत व्यक्त केले.
संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले.