न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२३) :- पोटच्या १६ वर्षीय मुलाला १२ व्या मजल्यावरुन खाली फेकून देत वडीलांनीही उडी मारुन आत्महत्या केली. वाकड येथील पलाश सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.
या घटनेमुळे पलाश सोसायटीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाप-लेक दोघेही मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलीस पुढील तपास पोलीस करीत आहेत.