- प्रकरण अंगाशी आल्यावर मुलीला जीवे मारण्याची दिली धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- नवीन कंपनीच्या शोधात असताना फिर्यादीची तोंड ओळखीची मुलगी (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हीने एका कंपनीच्या मालकाचा मोबाईल नंबर फिर्यादीला दिला. फिर्यादीने आरोपीशी संपर्क साधून कामाची गरज असल्याचे त्याला सांगितले. आरोपीने फिर्यादीला कामाचे अमिष दाखवून अज्ञात ढाब्यासारख्या हॉटेलवर नेले. फिर्यादीच्या इच्छेविरुदध तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. फिर्यादीने आरोपीला त्याबाबत विचारणा केली असता आरोपीने मोबाईलमध्ये तुझे फोटो आहेत, ते मी व्हायरल करील, अशी फिर्यादीला धमकी दिली. त्यानंतर आरोपी वेगवेगळया नंबर व लोकांकडून फोन करुन फिर्यादीला त्रास देवु लागला. त्यावेळी फिर्यादीने आरोपीला तुझी पोलीस स्टेशनला कंम्प्लेंट करणार आहे, असे सांगितले. आरोपीने फिर्यादीचा नंबर त्याचा मित्र सह आरोपी २ याला दिला. त्याने फिर्यादीला फोन करुन आरोपी १ याच्याबरोबर काय केले? मला माहीत आहे, तु जर आरोपीविषयी कोणाला काही सांगितले तर तुझा मर्डर करीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १३/०८/२०२२ सकाळी ८.३० वाजल्यापासुन दिवसभरात (नक्की वेळ सांगता येत नाही) महाळुंगे गावच्या हद्दीत व खेड बाजुकडे एक ते दिड तासाच्या अंतरावर (नक्की ठिकाण सांगता येत नाही) गाडीमध्ये घडला.
१९ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी विजयकुमार जनार्धन पोतदार (वय ५५ वर्षे, व्यवसाय कंपनी मालक, सध्या रा. संकेश्वर डाईन आयकॉन, रावेत), मिथुन जोगेंदर कुमार दास (वय २८ वर्षे, व्यवसाय कंपनी मालक, रा. सारा सिटी समोर, खराबवाडी, मुळगांव जोडोमु ता.वडंबा जि. कटक, राज्य ओडीसा) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात (दि. १) रोजी १८७/२०२३ भा.द.वि.क. ३७६,५०६.२४. सह अनुसूचित जाती-जमाती आधिनियम ३ / १ / डब्ल्यु / i & ii अन्वये गुन्हा दाखल केला आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
















