न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजी एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे, विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना, व्यक्ती कार्यक्रमात सहभागी होतात.
पिंपरी चिंचवड शहरात शिव जयंती रविवार, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आदी सर्वांची एक समन्वय बैठक शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीस सर्व संबंधित मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
















