न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्बमधून सवलत देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढला आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारीला निधन झाले. रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला मतमोजणी आहे. निवडणूक कामकाजासाठी महापालिकेतील २४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी रुजू झालेल्या त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्ब, फेस रिडिंग इम्प्रेशन प्रणालीमधून सवलत देण्यात आली आहे.
निवडणूक कामकाजातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना बायोमेट्रिक थम्ब, फेस रिडिंग इम्प्रेशन प्रणाली बंधनकारक असणार आहे, असे उपायुक्त जोशी यांनी आदेशात नमूद केले आहे.
















