न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२३) :- जातीचे दाखले लवकर काढून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयात नागरी सुविधा केंद्रातील डाटा एन्ट्री ऑपरेटरने महिलेकडे चार हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारीनंतर एसीबी पथकाने गुरुवारी कार्यालयात सापळा रचला. चार हजार रुपये घेताना आरोपीला रंगेहाथ पकडले. शैलेश अकांबरी बासुटकर (वय ४१) असे लाच घेणाऱ्या ऑपरेटरचे नाव आहे. पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस करीत आहेत.
















