- आजपर्यंत तब्बल ९३ व्यक्तींनी नेले १७० नामनिर्देशन पत्रं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आज (दि. ३) रोजी विहित वेळेत एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर ३२ व्यक्तींनी ६२ नामनिर्देशन पत्र नेले
आहेत.
३१ जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज अखेरपर्यंत एकूण ४ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली आहेत. तर ९३ व्यक्तींनी १७० नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
आज नामनिर्देशन पत्र नेलेल्यांची नावे :-
संतोष किसन नवले, मिलिंद रोहीदास कांबळे, शंकर पांडुरंग जगताप, मेहुल भरत जोशी, शंकर शिवाजी माने, श्रीगणेश तुकाराम कदम, राजेश यशवंतराव नागोसे, मोरेश्वर महादू भोंडवे, नंदू गोविंद बारणे, दयानंद नानासाहेब सरवदे, प्रविणकुमार अशोक कदम, ज्ञानेश्वर तुळशीराम मलशेट्टी, श्रीकांत शहाजी गोरे, रवि रमेश नांगरे, प्रशांत कृष्णराव शितोळे, निखील दिगंबर भोईर, मनोज मधुकर खंडागळे, भाग्यश्री निखील भोईर, सतीश श्रावण कांबिये, झेविअर अॅन्थोनी, सुरेश एकनाथ जगधने, सचिन दत्तातत्रय धनकुडे, सायली किरण नढे, सुहास पोपट गजरमल, प्रतिमा विनोदसिंह राजे, काटे आनंद दिपक, दिलीप खंडुजी पांढरकर, प्रियंका सलील कदम, राहुल निवृत्ती मदने, स्वप्नील भागीरथ बनसोडे, भाऊसाहेब सोपानराव भोईर, राजश्री ज्ञानेश्वर कोरडे.


















