न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- ओळखीचा फायदा घेवुन फिर्यादी महिलेबरोबर अश्लिल चाळे केले. घरात कोणीही नसतांना एकटेपणाचा फायदा घेवुन जबरदस्तीने वेळोवेळी शाररिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणास काही एक सांगीतले तर फिर्यादीसह त्यांच्या दोन्ही मुलांना जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी घरात असतांना तिच्यावरसुध्दा जबरदस्ती केली. फिर्यादीला ” तु तुझ्या मुलीचे लग्न माझ्याबरोबर लावुन दे, नाहीतर मी आपल्या दोघांचे व्हीडीओ व्हायरल करुन तुझी बदनामी करेल ” अशी धमकी दिली.
तसेच फिर्यादीची दोन्ही मुले डब्बा देण्यासाठी जात असतांना त्यांना रस्त्यात आडवुन मारहाण केली. आईला समजावुन सांग, माझे लग्न तुझ्या बहीनीबरोबर लावुन दे, नाहीतर तुम्हा दोघांनासुध्दा गायब करुन टाकील” अशी धमकी दिली. फिर्यादी या मुलीचे आरोपीबरोबर लग्न लावुन देनार नाही, अशी खात्री झाल्यावर फिर्यादी व त्यांच्या मुलीचे फोटो व अश्लिल कॉल रेकॉर्डींग व्हायरल केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार मागील ६ महिन्यांपासून आजपर्यंत सुरु होता. ४० वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी सद्दाम ऊर्फ उजाला जमसेद (वय ३५ वर्षे, रा. पिंपरीगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात १४७/२०२३ भा.द.वि कलम ३७६, ३७६ ( २-एन), ३५४, ३५४(अ), ३२३, ५०४, ५०६, लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८.१२, आय.टी. अॅक्ट कायदा कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















