न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- निगडी, टिळक चौकातील बस थांब्यावर (दि. २) रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास फिर्यादी महिला थांबली होती. तिथे अचानकपणे आरोपी आला. त्याने फिर्यादीचा हात पकडून आपल्याकडे ओढले. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कत्य केले. त्यास विरोध केला असता त्याने फिर्यादीला धक्काबुक्की आणि मारहान केली. हात पकडुन मुरगळुन अश्लील शिवीगाळ केली. माझ्यासोबत आली नाही तर तुला व तुझ्या कुटूंबाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
२२ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी दशरथ मंगलसिंग साबळे (वय २६ वर्षे रा. फ्लॅट नं. ५०१, सावली प्रेस्टिज, नांदेड फाटा, नांदेडगाव जि. पुणे, मुळ गाव घर नं. ३७९, गोदरी रोड, गोदरी, ता. जामनेर जि. जळगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी आरोपी विरोधात ८२/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४, २९४, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
















