- दिघी पोलीसांची कारवाई; तेरा गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- गाईंना इन्जेक्शन देवुन त्यांना बेशुद्ध करुन त्यांची कत्तल केली जात होती. या गाईंची वाहतूक करणाऱ्या टोळीला दिघी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडुन ताब्यात घेण्यात आले आहे. सह जणांना अटक करुन त्यांच्याकडून २५.२०,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबत माहिती अशी की, दिघी पोलीस ठाणे येथे गु. रजि नं. ४८४ / २०२२ भा. द. वि कलम ४२९, ३७९, ४१५ ३४ सह प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सन २०१६ चे कलम ५. ५(अ). ५(च) ६.९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(अ). १३५ अन्यये तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयात गाईना इन्जेक्शन देवून त्यांना बेशुदध करुन त्यांची वाहतुन करुन त्यांची कत्तल करण्यासंदर्भात गुन्हे घडलेले होते. या गुन्हयांचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलिसांना आदेश दिले होते. तपास चालू असताना (दि. २८/१२/२०२२) पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना दिघी-आळंदी रोडवर एक संशयित नंबर नसलेली कार फिरताना पोलिसांना दिसली. गाडीचा पाठलाग केला असता गाडीतील चार इसम त्याच्या ताब्यातील गाडी पंचशिल बुद्ध विहारच्या मागे, शिवनगरी कॉलनी, कच्चा रस्ता, दिघी येथे सोडुन बाजुच्या टाटा कम्युनिकेशनच्या जंगलात पळुन गेले होते. ही गाडी गाईची वाहतुक करत असल्याचा संशय पोलिसांना आल्याने ती जप्त करण्यात आली होती. गाडीच्या इंजीन नंबर वरुन मालकाची आरटीओकडुन माहिती घेतली. (दि. १६/०२/२०२२) रोजी गाडी (एमएच ०१ बीके १६६१) मालकाची पोलिसांनी चौकशी केली. सदरची गाडी ६ वेगवेगळया इसमांना विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच सदरची गाडी एकाकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. (दि. १९/०१/२०२३) रोजी आरोपीचा मिरारोड, काशिमीरा, नयानगर येथे शोध घेतला असता तो मिळुन आले नाही. त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल नंबर तसेच त्याचे साथिदारांचे मोबाईल नंबरचे सिडीआर तसेच घटनास्थळावरील डम्प डाटा तसेच घटनास्थळाचे आजुबाजुच्या परीसरातील डम्प डाटाचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात पाहीजे आरोपीचे तसेच त्याच्या साथिदारांचे नावे निष्पन्न केली.
(दि. २८/०५/२०२२) रोजी तपास पथकाने पाहिजे आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून आरोपीचा कुसेगाव काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला. लोकेशनच्या जवळ एक इन्होवा गाडी संशईतरित्या उभी असलेली दिसली. आरोपीचा परीसरात शोध घेत असताना संशईत इन्होवा एक अनोळखी इसम भरधाव वेगाने घेवुन जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी दुचाकीवरून आरोपीचा पाठलाग केला. सदरचा इसम कार पश्चिम द्रुतगती मार्गाने रस्त्याच्या विरुदध दिशेने घेवुन घोडबंदर रोडच्या दिशेने जाताना दिसला. त्याचा पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेतले. हशीम मोहम्मद कुरेशी (वय २१ वर्ष) यास इन्होवा गाडी (के. एमएच ०६ एएल ०६९९) हिच्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर हशीम कुरेशी याचेसोबत जावुन पाहीजे आरोपी आरीफ कुरेशी अशरफ कुरेशी यांचा शोध घेण्यासाठी नयानगर पोलीस ठाण्यात शोध घेत असताना पूजा नगर मिरारोड येथे अशरफ कुरेशी रस्त्याने जाताना दिसला त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून गेला त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले.
मोहम्मद आरीफ सुलेमान कुरेशी वय ५१ वर्षे यास ताब्यात घेतले. त्यानंतर पाहिजे आरोपी मो. शाईद सुलेमान कुरेशी वय ४२ वर्षे प मोसिन बाबु कुरेशी, वय २८ वर्ष याचा मिळुन आले असता त्यांना ताब्यात घेतले. एकूण ०५ आरोपी यांना दि. २९/०१/२३ रोजी अटक केली असता त्याना दि. ०३/०२/२३३ रोजी पर्यंत पोलीस कोडडी सुनावली होती. अटक आरोपी यांचे मदतीने दि. ०१/०२/२३ रोजी मुंबई येथे जावुन पाहिजे आरोपी साहेल मो. फारुक कुरेशी, वय ३३ वर्षे, धंदा मांसविक्री यांचा माहिम येथे शोध घेतला असता तो एक्सयुव्ही ५०० कार क्रं. एम क्र. ०४ एफझेड ८४७८ या वाहनासह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले तसेच गाडीत गाईंची कत्तल करण्यासाठी वापरेलेले साहित्य ३ कोयते व २ सत्तुर व इन्जेक्शन मिळुन आले. आरोपीला अटक करण्यात आली असुन त्यास दि. ०७/०२/२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक आरोपीकडून एकूण २५,२०,९८० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ५,००,००० रू. कि. ची सेरोलेट कंपनीची इन्जॉय सिल्व्हर रंगाची कार नं. एम एच ०१-बी-के-१६६१२) १०,००,००० रू. कि. ची टोयोटा कंपनीची इनिव्हा सिल्व्हर रंगाची त्याचा नंबर (एम. एच ०६ ए. एल-०६९९३) १०,००,००० रू. कि. ची एक्स यु व्ही-५०० कार न. एम.एच-०४-एफ झेङ-८४७८, दोन लोखंडी सत्तुर, तीन लोखंडी कोयते, नायलॉनच्या दोन लांब रस्सी, लोखडी कानस, निळ्या रंगाच्या पिशव्या, रिकाम इंजेक्शन, औषधाची काचेची बाटली, नंबर प्लेट, अटक आरोपी यांचेकडून जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकूण १३ गुन्हे उघड करण्यात आले आहे.
दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गु. रजि नं. ४८४ / २०२२ भा. द. वि. कलम ४२९, ३७९, ४११, ३४ सह प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५. ५(अ). ५(३), ६.९. दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरत, ३७६/२२ भादवी कलम ४२९, ३७९. दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक. ५१/२३ भादवी कलम ३७९ ४२९. ३४ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५. ५(अ), ६.२. पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्र. ८५५/२२ भादवी कलम ३०९ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५(अ) (१) (क), ९.९ (अ), पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुर १०१२/२२ भादवी कलम ३७९.४२९ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५ (क), २ (अ), पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक २०/२२ भादवी कलम ३७९ ७) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरकं. ७५२/२२ भादवी कलम ३७९.३४ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५. ५(अ). ९, भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक्र. ४१६/२१ भादवी कलम ४२९, ३४ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५. ५(अ).६, ९. देहुरोड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरकं ५१९ / २२ भादवी कलम ४२९.३४. वाकड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरक, ११०७/२२ भादवी कलम ३७९, ४२९ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५(क), (9(अ), खेड पोलीस ठाणे पुणे ग्रामिण गुरक्रं. ७७/२२ भादवी कलम ३७९. कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर आयुक्तालय गुरकं. १५/२३ भादवी कलम ३७९. हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर आयुक्तालय गुरक्रं. १६०१/२२ भादवी कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम सुधारण सण २०१६ चे कलम ५ (क). ९ (अ). (ब). या कारवाईत एकूण २५,२०,९८० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयातील ०९ आरोपीची नावे निष्पन्न करून काशिमीरा, मिरारोड, नयानगर, माहिम मुंबई येथून एकुण ०६ आरोपींना अटक करण्यात आली आहे..
मोशीन बाबु कुरेशी, वय २८ वर्षे, रा. मिरारोड, काशिम गोडसा बाबा दर्गा रोड काशिमिरा ठाणे, मोहम्मद शाहिद रहेमान सुलेमान कुरेशी, वय ४२ वर्षे, रा. मिरारोड, माशिमिरा गोडसाबाबा दर्गा जवळ, ठाणे, हाशिम मोहम्मद अब्दुल रहेम कुरेशी, वय २१ वर्षे रा. मिरारोड, माशिमिरा गोडसाबाबा दर्गा जवळ, ठाणे, अशरफ सुलेमान कुरेशी, वय ३२ वर्षे, रा. मिरारोड, पुजानगर, केजीएन टॉवर रुम नं. ४०३. मिरारोड, ठाणे, मोहम्मद अरिफ सुलेमान कुरेशी वय ५२ वर्षे, रा. मिरारोड, पुजानगर, केजीएन टॉवर रुम नं. ४०३ मिरारोड, ठाणे, सोहेल मो. फारुक कुरेशी, वय ३३ वर्ष, धंदा मांसविक्री, रा पिएमजीपी कॉलणी. बिल्डींग नं ०६/४१०, धारावी डेपो जवळ, *मुंबई यांना ता. २९/०१/२०२२ रोजी अटक करण्यात आली असुन ता. ०३/०२/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास पोउपनि भदाणे हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त सो. श्री. मनोजकुमार लोहीया, मा. अप्पर पोलीस आयुक्त सो, डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उपायुक्त सो परीमंडळ ०१. श्री. विवेक पाटील मा. सहायक पोलीस आयुक्त सो, चाकण विभाग, श्रीमती प्रेरणा कट्टे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे श्री. दिलीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सुनिल भदाणे, पोलीस उप निरीक्षक, पोहा ७१३ चितामण फलके, पोहा ८०१ प्रदीप पोर्ट पोहा १०२० किशोर कांबळे, पोहा ११६८ सतीष जाधव, पोना १५७१ बाळासाहेब विधाते, पोना १५७२ किरण जाधव, पोना १६६५ नवघिरे पोना १२५५ / दौंडकर, पोशि २०१२ रामदास दहीफळे. पोशि २०९४ बाबाजी जाधव व पोशि २५५८ / शिंदे यांनी तसेच मोना १६२० / भागश्री जमदाडे पोलीस उपायुर्वेद कार्यालय परी ०१ यांनी केली.















