न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवडमध्ये परप्रांतीय तरुणाच्या डोक्यावर हत्याराने मारहाण अज्ञात कारणासाठी त्याचा खून करण्यात आला आहे. हा प्रकार (दि. ३) रोजी रात्री ८.३० वाजता ते (दि. ४) रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अजंठानगर झोपडपट्टीच्या टेकडीवरील पाण्याच्या टाकीच्या आतमधील मोकळया जागेत घडला.
फिर्यादीचा भाऊ उत्तमकुमार संतोष तिवारी (वय १९ वर्षे, धंदा मजुरी रा. छाया मोबाईल शॉपी जवळ, कुदळवाडी, चिखली, मुळ पत्ता बिहार) याने अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ८१/२०२३, भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















