न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- हॉस्पीटलमधील वर्कींग रुममध्ये फिर्यादी होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम आत आले. त्यामधील एकाने फिर्यादीचे तोंड जोरात दाबून धरुन डोळयात मिरची पावडर टाकली.
फिर्यादीच्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन तोडुन घेतली. दुस-याने फिर्यादीच्या पाकीटातील रोख रक्कम काढली. असा एकुण २५,३०० रुपयांचा ऐवज काढून दोघे आरोपी हॉस्पीटलबाहेर पळुन गेले, असे फिर्यादी नमूद आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास राक्षे डेंन्टल क्लीनीक हॉस्पीटल, कासारासाई येथे घडला. महिला फिर्यादीने दोन अनोळखी व्यक्तीं विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हिंजवडी पोलिसांनी १००/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















