- निवडणूक कार्यालयात गर्दी उसळण्याची शक्यता; पोलीस यंत्रणा सतर्क…
- आज भाजपसह या अपक्षांनी भरले अर्ज; तर यांनी नेले अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या मंगळवारी (दि. ७) अखेरचा दिवस आहे. अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक व पोलिस यंत्रणा संतर्क झाली आहे.
पोटनिवडणुकीसाठी अर्ज वाटप व दाखल करण्यास ३१ जानेवारीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल १२३ जणांनी एकूण २२० अर्ज नेले आहेत. तर १४ जणांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, एमआयएम आणि अपक्षांचा समावेश आहे. आज सोमवारी १० उमेदवारांनी १७ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. तर १२ व्यक्तींनी २१ पत्र नामनिर्देशन पत्र नेले आहेत.
थेरगाव ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. उमेदवारांसोबत केवळ पाच जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच, कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात उमेदवाराच्या फक्त तीन वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेने परिसराची रविवारी (दि. ५) पाहणी केली.
आज नामनिर्देशन पत्रे दाखल करणाऱ्यांची नावे :-
अश्विनी लक्ष्मण जगताप – भारतीय जनता पार्टी (मुख्य उमेदवार) ४ अर्ज, शंकर पांडुरंग जगताप – भारतीय जनता पार्टी (पर्यायी उमेदवार) ४ अर्ज, मोहन भागवत म्हस्के – बहुजन भिम सेना (AB फॉर्म विहित नमुन्यात नाही), रवींद्र विनायक पारधे-अपक्ष १, बालाजी लक्ष्मण जगताप अपक्ष १, गोपाळ यशवंत तंतरपाळे – इंडियन नॅशनल कॉंग्रेस (AB फॉर्म प्राप्त नाही) २ अर्ज, अमोल (देविका) अशोक सूर्यवंशी अपक्ष १, सिद्धीक इस्माईल शेख – अपक्ष १, किशोर आत्माराम काशीकर – अपक्ष १, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले – अपक्ष १,
आज नामनिर्देशन पत्रे नेणाऱ्यांची नावे :-
तेजस ज्ञानेश्वर माझिरे, मनोहर नामदेव पाटील, गिरिश ज्ञानेश्वर शेडगे, विद्या मनोहर पाटील, हरी तापीराम महाले, उत्तम रंगा सकटे, अॅड. सुभाष सावन माछरे, दिपक रमेश श्रीवास्तव, चंद्रकांत शरणाप्पा खोचरे, पृथ्वीराज धर्माजी थोरात, रॉय अनिल कंडाथीलपरमवील, चंद्रकांत रंभाजी मोटे
















