- चिखलीत किरकोळ कारणावरून महिलेचा विनयभंग अनं धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- मुलीसह शतपावली करीत असताना अचानक फिर्यादीच्या अंगावर आरोपीचा कुत्रा धावून आला. फिर्यादी घाबरल्या. तुमचा कुत्रा मला चावला असता, असे आरोपीला म्हणाल्या. त्यावर ‘ तुला चावला का? तर बोलायचे ‘, असे म्हणत आरोपीने फिर्यादीला अश्लील बोलून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच ‘ माझ्या नादाला लागली तर तुला व तुझ्या नव-याला जिवे मारुन टाकीन’, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी रात्री १०.०० वाजता ओमसाई सोसायटीच्या रोडवर, ताम्हणेवस्ती, चिखली येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी सिंग निवृत्ती नरोटे (वय ३६ वर्षे रा. ओमसाई सोसायटी ताम्हणे वस्ती, चिखली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपी विरोधात ८०/२०२३ भा.द.वी. कलम ३५४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















