न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.
त्या अनुषंगाने निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प समूहाजवळील मोकळ्या मैदानाची उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी अ प्रभाच्या क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, उपअभियंता संजय खरात, सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांचे समवेत पाहणी केली. यावेळी भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, सागर तापकीर,अभिषेक म्हसे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिका अधिका-यांनी निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प समूह उद्यानातील स्थापत्य, विद्युत तसेच आरोग्य विषयक कामांची देखील पाहणी केली. १९ फेब्रुवारी रोजी येणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या दुरुस्तीसाठी कार्यक्रम स्थळांची पाहणी करण्यात येत असल्याची माहिती उप आयुक्त घोडके यांनी दिली.


















