- चार आस्थापनांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कुदंननगर, कासारवाडी पुणे येथील मे. कोटेश्वर टिबंर्स, मे. मॅक्स न्युरो रुग्णालय, मे. शुभम इंडस्ट्रीज, मे. जयगणेश टायर्स / अरिहंत इंजिनिअरींग या मिळतींना दि. ३१/१/२०२३ रोजी पहाटे २.०० वा लाग लागली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक विभागाने पिंपरी, भोसरी, प्राधिकरण, रहाटणी, चिखली व पुणे मनपा, पिएमआरडीए, खडकी कॅन्टोनमेंट, टाटा मोटर्स इ. अग्निशामक विभागाकडील एकुण १४ अग्निशमन वाहनांच्या साह्यांने आग वेळेत आटोक्यात आणून अंदाजे ५ तांसात पुर्णपणे क्षमविणेत आली होती.
मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे रबर टायरचा साठा होता. रबर टायरला आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट झाले होते. धुरामुळे शेजारील मॅक्स न्युरो रुग्णालयांतील रुग्णांच्या जीवास धोका निर्माण झाला होता. अग्निशमन विभागाने या मिळकतींवर भारतीय दंड संहिता
१८६० अधिनियमान्वये कलम ४३६,३३६,२८५,२६८,२९०,१८८,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६” हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू असून अधिनियमातील कलम ३ (१) प्रमाणे कोणत्याही निवासी, वाणिज्य, मिश्र, व्यवसासिक मिळकती किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणा-या आग प्रतिबंधक उपयायोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची आहे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहरातील सर्व व्यवसायिकांना महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.
















