न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- बँक ऑफ महाराष्ट्र येथील फिर्यादीच्या अकाऊंट नंबरवरून अज्ञात आरोपीने २,५९,८५० रुपये ऑनलाईन पध्दतीने अज्ञात एच.डी.एफ.सी बँकेचा अकाऊंट नंबर व इतर अकाऊन्टमध्ये ट्रान्सफर केले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३१/१२/२०२२ ते ०२/०१/२०२३) फिर्यादीच्या मोबाईल फोनवर घडला.
फिर्यादी शरद भीमराव पवार (वय ४९ वर्षे, धंदा नोकरी रा. द्रौपदी बिल्डींग प्लॅट नं. ३, ४४ गजानन महाराज नगर, लेन नं. १, पिंपळे गुरव) यांनी आरोपी एच.डी.एफ.सी बँकेचे अकाऊंट (५०१००५७०६८०३४०) धारक, इतर अकाऊंट धारक व अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ५८/२०२३ भादवि कलम ४२० माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी), ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















