न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- डाटा व सीडीआर डाटा नातलगांच्या होणा-या लग्नामध्ये स्क्रिनवर दाखवून बदनामी करण्याची महिलेला आरोपीने फोन करून धमकी दिली. त्या बदल्यात आरोपीने फिर्यादीकडे ५०,००० रुपये व नंतर १,००,००० रुपयांची खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २) रोजीचे रात्री ८:३५ वा. ते (दि. ५) रोजी रात्री ११.५२ दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलवर घडली.
३२ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी मोबाईल क्र. ७४८८८४२६८० यावरुन बोलणारा अनोळखी इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपीविरोधात ११६/२०२३ भा.द.वि. कलम ३८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















