- उद्या अर्जाची छाननी; १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आज दि. ७ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विहित वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे २६ उमेदवारांनी ३१ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
दरम्यान, आज अखेर पर्यंत १२८ व्यक्तींनी २३१ नामनिर्देशन पत्रे नेली होती. दिनांक ३१ जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली होती.
आज अखेर पर्यंत एकूण ४० उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
उद्या ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.


















