- अनामत रक्कम म्हणून आणली चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या एका उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर आणली. याच कारणामुळे निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळाले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी राजू काळे यांनी अनामत रक्कम म्हणून १० हजारांची चिल्लर आणली होती. यामध्ये १ रुपया, २ रुपये, ५ रुपये आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता.
निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनामत रक्कम मोजताना चांगलीच कसरत करावी लागली. शेवटी काही काळ सर्वच अधिकारी चिल्लर मोजत बसले आणि मोजणी पूर्ण केली. किमान अर्धा तास चिल्लर मोजण्याचे काम सुरू होते.


















