- दोन बेड प्रसुतीसाठी राखीव; रुग्णांना काहीसा दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात १० बेडचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. ही सुविधा सुरू झाल्याने त्याचा रुग्णांना फायदा होत आहे.
नवीन जिजामाता रुग्णालयात दिवसाकाठी ५५० रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. प्रसुतीसाठी आलेले रुग्ण, हृदयरोग, तसेच मधुमेह आजार उद्भवलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जात आहेत. मात्र, पूर्वी आयसीयूची गरज पडल्यास इतर रुग्णालयात पाठविण्याची नामुष्की रुग्णालयावर येत होती. त्यामुळे मोठी गैरसोय व्हायची. ही गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आयसीयू बेड कार्यान्वीत करण्याची कार्यवाही केली.
सध्या रुग्णालयात १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरू केला आहे. ही सुविधा दिल्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाशी संबंधीत आजार असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जात आहे. सध्या आठ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरीत दोन बेड प्रसुतीसाठी राखीव ठेवले जात आहेत.
दोन महिन्यांपासून आयसीयूची सुविधा सुरू झाली आहे. पूर्वी अतिगंभीर रुग्णांना आयसीयू अभावी इतर रुग्णालयात पाठवावे लागत होते. आता प्राथमिक पातळीवर आपण उपचार करू शकतो. १० बेडचा विभाग असून दोन प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवतो. – डॉ. सुनिता साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिजामाता रुग्णालय….


















