- पिंपरी अजमेरा येथील घटना; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- हिटलर क्रॉस चायनिज हॉटेलमध्ये फिर्यादी साफसफाई करीत होते. त्या दरम्यान दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी हातात कोयता, कु-हाड व तलवार घेवुन फिर्यादीच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. तेथील कामगारांना शिवीगाळ, धमकी देऊन दहशत निर्माण केली. हॉटेलच्या टेबलतील ड्रॉवरमधुन १५०० रुपये जबरदस्तीने घेवुन आरोपी निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ५) रोजी रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान मासुळकर बस स्टॉप समोर, अजमेरा, पिंपरी येथे घडली. फिर्यादी बालकृष्ण जीतमान श्रेष्ठ (वय ३३ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं १०४, टि ए ३/४, जागृती हौ सोसा., अजमेरा, पिंपरी) यांनी अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात १६६/२०२३, भा.दं.वि. कलम ३९२, ५०४, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महा.पो.का.क. ३७ (१) १३५ सह क्रि. लॉ. अमेंडमेंट १९३२ चे क. ३,७ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.