- सासरच्यांनी विवाहीतेकडे केली होती हुंडा आणि फोर व्हिलरची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- लग्नामध्ये काहीच घेवुन न आल्यामुळे कुटुंबातील आरोपींनी फिर्यादीकडे माहेरहून फोर व्हिलर गाडी व सोन्याचे दागीने घेवुन येण्याची मागणी केली. त्यांना मानसिक व शाररिक त्रास दिला. माहेरच्या लोकांविषयी आरोपी वाईट बोलले. तसेच फिर्यादीच्या पतीने फिर्यादीच्या नकळत दुसरे लग्न केले. फिर्यादीच्या घरातील लोक आरोपीच्या दुस-या लग्नाबाबत विचारणा करण्याकरीता गेले असता, फिर्यादीच्या आरोपी पतीने तीन वेळा तलाक बोलून फिर्यादी यांना घरातुन बाहेर हाकलुन दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १५/०२/२०२१ ते ०४/०२/२०२३ पर्यंत, स.नं ३/३५, हजरत टिपू सुलतान झोपडपट्टी, चिंचवड, डी. मार्ट जवळ, चिंचवड येथे घडली. महिला फिर्यादीने महिला आरोपी, सासरे ईस्माइल शेख (वय ६५ वर्षे), पती ईलाही ईस्माइल शेख (वय ३९ वर्षे), महिला आरोपी, महिला आरोपी, दिर जावेद शेख (वय ३३ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी १६८/२०२३ भा.द.वी. कलम ४९८ (५), ४९४,३२३, ५०४, हुंडा प्रतीबंधक अधिनियम कायदा कलम ४, मुस्लिम महिला (वैवाहिक अधिकारांचे संरक्षण) अधिनियम २०१९ कलम ४ अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















