न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- घरासमोरील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला फिर्यादीने त्यांची स्कॉडा ऑक्टीवा (एमएच १४ एफ.जी ६०९०) हे वाहन पार्क केले होते. अज्ञात आरोपीने या वाहनाची कारची खिडकीची पाठीमागील काच खाली केली. त्यातून दीड लाख रुपये किमतीचे पिस्टल रिव्हॉलवर (३२ एनपी बोर पिस्टल नं. २१९१२८७७९, आरएफआयआयएन २०२१ एमके २१ ओएफ) व पाच राऊंड चोरून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ६) रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास प्लॉट नं २, से. नं २४, टेल्को कपुर सोसायटी, प्राधिकरण, निगडी येथे घडली.
फिर्यादी पवन मनोहरलाल लोढा (वय ३६ वर्षे, व्यवसाय, रा. प्राधिकरण निगडी) यांनी अज्ञात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ९२/२०२३ भा.द.वि कलम ३७९ अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.