न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन आरोपी दुचाकीस्वाराने हयगयीने भरधाव वेगात त्याची (एमएच १२ जेई ६५३५) दुचाकी चालविली. दरम्यान फिर्यादी हे त्यांचे लहान भाऊ गजेंद्र मांगीलाल सोलंकी यांच्यासह (एम.एच.१४ जे.डब्लु.१५११) या दुचाकीवरून जात असताना हॅलोसिटीकडे यु टर्न घेत होते. त्यावेळी फिर्यादीच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीने धडक दिली. त्यात फिर्यादी आणि त्यांचा भाऊ यांचा डावा पाय, डाव्या हाताची दोन बोटे अपघातात फॅक्चर झाली. तसेच दोघांना गभीर दुखापत करून आरोपीने स्वतःसह फिर्यादीच्या दुचाकीचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि. ४) रोजी रात्री ११.१५ वाजता महाराणा फर्नीचर समोर, हिंजवडी फेज थ्री रोड, माण, ता. मुळशी, पुणे येथे घडला.
फिर्यादी बलवीर मांगीलाल सोलंकी (वय २८ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. व्हॅलोसिटी सोसायटी, फ्लॅट नंबर ३०४, मॅजीक मेडीकलचे पाठीमागे, हिंजवडी फेज ३) यांनी आरोपी (एम.एच. १२ जे.ई. ६५३५) अनोळखी दुचाकीचालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी १०६ / २०२३ भा.द.वी. कलम २७९,३३८,४२७, मो.वा.का. कलम ११९/१७७, १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.















