न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- घरासमोर कागद, कचरा फेकल्याने फिर्यादी दिराच्या मुलाला ‘अरे घरासमोर कचरा का टाकतो’ असे मोठया आवाजात ओरडल्या. मुलगा रडत रडत घरी गेला. या कारणावरुन आरोपी दिराने ‘तु माझ्या मुलास का मारले? असा फिर्यादीला जाब विचारला. त्यांना शिविगाळ करुन हाताने मारहाण केली.
सह आरोपी २ हिने फिर्यादीस ‘तुमने मेरे बेटे को सुबह क्यु मारा, तुम हमारे खिलाप तक्रार करने को कैसे जाती, ये देखता हूँ’ असे म्हणत फिर्यादी महिलेला शिविगाळ करुन लाकडी दांडक्याने डाव्या पायाच्या घोटयाच्यावर मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीची मुलगी रुही हिच्या डाव्या हाताच्या मनगटावर लाकडी दांडक्याने मारुन तिलाही जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ५) रोजी रात्री १०.०० वाजता फिर्यादीच्या राहत्या घरासमोर, सार्वजनिक रस्त्यावर व रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास पवन सुपर मार्केटजवळ, नेहरुनगर, पिंपरी येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
फिर्यादी मधु सुनिल वाल्मीकी (वय २४ वर्षे, धंदा- हाऊसकिपिंग, रा. दोस्ती बेकरीजवळ, विठठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांनी आरोपी विकी महेश वाल्मीकी, कविता विकी वाल्मीकी (रा. दोघेही दोस्ती बेकरीजवळ, विठठलनगर, नेहरुनगर, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी दोघांच्या विरोधात १६९/२०२२ भा.द.वि कलम ३२५, ३२३, ५०४, ३४ नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
















