- उच्च न्यायालयाकडून याचिका खारीज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- तत्कालीन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी शासकीय कामात अडथळा प्रकरणी दाखल केलेला गुन्हा मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून रद्द करण्यात आला आहे.
२०१७ मध्ये शिवसेनेचे शिक्षक नेते संभाजीराव शिरसाट व इतर सहकारी शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. पुणे या कार्यालयात गेले होते. कार्यालयामध्ये गेल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा झाली व सर्व शिक्षक पदाधिकारी त्या कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर संभाजीराव शिरसाट व इतर सहकारी यांच्यावर शैलजा दराडे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
हा खोटा गुन्हा दाखल केला होता तो रद्द करण्यासाठी संभाजीराव शिरसाट यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्र.५२१५/२०१७ अन्वये दाखल केली होती. त्यावर मा.उच्च न्यायालयात मुंबई येथे सुनावणी होऊन मे. न्यायाधीश रेवती मोहिते डेरे मॅडम व पृथ्वीराज चव्हाण या संयुक्त न्यायालयीन पिठासीनाने ३५३ कलमा अन्वये दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याने रद्द केला आहे.















