न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२३) :- पिंपळे निलख येथील पंचशीलनगरमध्ये माता सावित्रीबाई, माता रमाबाई यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची संकल्पना सौ. (लिलावती) सुषमा सुरेश शिंदे यांची होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विद्याताई जगताप या होत्या. शारदाबाई आक्का मुंडे यांनी ‘मी रमाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर केला.
यावेळी राहुल मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप जगताप, मंडळाचे खजिनदार सुरेश शिंदे, युवा अध्यक्ष निखिल शिंदे, मैत्रेय शिंदे, जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जगताप, दत्तात्रय जगताप, वानखेडे काका, साहेबराव जगताप, साहेबराव कावळे, बौद्धाचारी राहुल वाघमारे, शोभित घाडगे, अजय नांगरे, विनायक कांबळे, मंडळाच्या महीला सदस्या भारती जगताप, सविता कांबळे, सुनीता जगताप, मंगल धनवे, सुषमा वाघमारे, शैला निकाळजे, रेश्मा वानखेडे, सुकन्या शिंदे, प्रिया जगताप, कौसल्या आवडे, दीपा कांबळे, आरती जावळे, रजनी केदारी आदी उपस्थित होते.
सुषमा शिंदे म्हणाल्या, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपण आहोत. स्त्री शिक्षणाची दारे त्यांनी खुली केली. त्यामुळे आजची स्त्री मोठमोठ्या हुद्द्यावर आहे. माता रमाई यांनी जो त्याग केला, त्यामुळेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण भारताला संविधान दिले. या संविधानामुळे महीलांना न्याय हक्क मिळवून दिला.
सुत्रसंचालन आणि आभार संगीता कांबळे यांनी मानले.












