- अंगावरील चेन आणि सोन्याची अंगठी घेऊन चोरांचा पोबारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- हॉटेल बंद करुन फिर्यादी त्यांच्या टि.व्ही.एस अपाचे (MH-02/FC-0670) गाडीवरून घरी जात होते. दरम्यान दोन अज्ञात इसम वाटेत आडवे आले. त्यांनी फिर्यादीची गाडी थांबवुन त्यांच्याकडे पेट्रोलची मागणी केली. फिर्यादी यांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. आरोपींनी फिर्यादीच्या गाडीची चावी काढली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी बरोबर झटापट केली. फिर्यादीला कसल्यातरी हत्याराचा धाक दाखवुन आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील ७५,००० रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व ६०,००० रुपये किंमतीची १२ ग्रॅम वजनाची बोटातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढुन घेवुन चोरुन नेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ७) रोजी रात्री १०.१५ वाजता आंबेठाण, ता. खेड, पुणे गावच्या हद्दीत आयोध्यानगरी जवळील प्लॉटींग मधील मोकळया जागेत घडला.
फिर्यादी दिवेश श्रीनाथ भाडळे (वय २३ वर्षे, धंदा हॉटेल, मुळ रा. कोयाळी, ता. खेड, सध्याचा पत्ता – घाटेवस्ती आंबेठाण) यांनी आरोपी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी आरोपी विरोधात ०९/२०२३ भादवी कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















