न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- सस्तेवाडी येथील मोशी-आळंदी नवीन बीआरटीतील चौधरी ढाबा येथील रस्त्यावर फिर्यादी हे दुचाकी बाजूला लावून थांबले होते. दरम्यान फिर्यादी फोनवर बोलत असताना स्विप्ट कार (एमएच१४एचजी३२७०) मधील आरोपी दोन अनोळखी इसम कारमधुन खाली उतरले. आरोपी फिर्यादीजवळ गेले.
फिर्यादीला ‘इथे काय करतो, आम्ही काय बोलतो याकडे लक्ष देता येत नाही का?’ असे म्हणत हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या गळ्यातील ४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन रुपये वीस हजार आणि खिशातील रोख रक्कम ६००० रुपये असा एकूण २६,००० रुपये किंमतीचा माल जबरदस्तीने काढून घेतला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ७) रोजी ११.५० वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी संजय भऊलाल गडकर (वय ३९ वर्षे, रा. सी.ओ राम हरी गायकवाड यांची चाळ, चंदन मेडीकल मागे, गायकवाड वस्ती, मोशी) यांनी स्विप्ट कार (एमएच१४/एचजी३२७०) मधील दोन अनोळखी इसमांविरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. योगेश आत्माराम पाटुळकर (वय २४ वर्षे रा. मुपो केळगाव आळंदी ता खेड), माधव पंढरी ताले (वय २६ वर्षे रा. साई मंगल कार्यालय, आळंदी पोसॉ ऑफीसजवळ, आळंदी) यांच्यावर पोलीस ठाण्यात ४५/२०२३ भादवि कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















