वारकर्यांचा पेहराव करत विद्यार्थी सोहळ्यात सहभागी झाले होते. गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ, मृदुंग तर मुलीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन व मुखातून ज्ञानबा तुकारामांच्या नावाचा जयघोष यामुळे शाळेचा सर्व परिसर भक्तिमय झाला होता. तर वारकरी व विठ्ठल रुक्मिणीचा वेष परिधान केलेले चिमुकले लक्ष वेधून घेत होते.
मुख्याध्यापिका अनिता जांभळे यांच्या हस्ते ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नीता सोनवणे शिल्पा पंडित,वैशाली चौधरी, सुरेखा गायकवाड, शीला झोडगे व उज्वला ढवळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


















