पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरी करते. तिचे फेसबुकवर खाते आहे. 2017 मध्ये त्यांना जेम्स रोझ नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांचे बोलणे झाले आणि त्यांची मैत्री झाली.
आरोपीने त्यांचा विश्वास संपादन करून मोबाईलवर संपर्क साधला आणि लंडन येथे मोठ्या कंपनीत नोकरीस असल्याचे सांगितले. महिलेचा वाढदिवस कधी असतो याची माहिती घेतली. त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने परदेशातून गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगून त्यांचा पत्ता घेतला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी फिर्यादी महिलेला एक महिलेचा फोन आला फोन आला तुमचे पार्सल आले आहे ते सोडून घेण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले.
त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा 35 हजार रुपये भरले. त्यानंतर परत फोन आला आणि गिफ्ट वस्तू ही पौंड असून त्यासाठी 50 हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. फिर्यादी महिलेने वेळोवेळी 85 हजार रुपये भरले परंतु गिफ्ट न मिळाल्याने त्यांनी तक्रार दिली आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


















