न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- शासन आदेशानुसार राज्यातील सर्व ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला मुलींची सर्वांगीन आरोग्य तपासणी करणे करिता “ बाल सुरक्षा अभियान – जागरुक पालक सुदृढ बालक ” अभियान दि.०९ फेब्रुवारी २०२३ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा शुभारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरुनगर येथील शाळेमध्ये आज दि. ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आला. यावेळी राज्यशासनाचे प्रतिनिधी बाळासाहेब वाल्हेकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. उज्वला अंदुरकर, डॉ.मनिषा क्षिरसागर, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, डॉ.शैलजा भावसार, बालरोगतज्ञ डॉ. दिपाली अंबिके, वैद्यकीय अधिकारी डॉ.छाया शिंदे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चैताली इंगळे, मुख्याध्यापिका सविता वव्हाळ, स्वाती निकम, मधुमती गुंजेकर, पी.एच.एन. यशस्वीता बाणखेले, दिपाली नवले व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब वाल्हेकर यांनी “ बाल सुरक्षा अभियान – जागरुक पालक सुदृढ बालक ” अभियान दि.०९ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झालेले असून सदर अभियानांतर्गत आपल्या पाल्यांची शाळेमधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
तसेच यावेळी डॉ. वर्षा डांगे यांनी या अभियानांतर्गत मनपा कार्यक्षेत्रामधील शासकीय, अनुदानित, खाजगी शाळा व मनपा व खाजगी अंगणवाडी, बालवाडी अशा एकुण ११८२ शाळा/अंगणवाडी मधील वय वर्षे ० ते १८ वयोगटामधील एकुण अंदाजित ४,२२,००० विद्यार्थी व बालकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. सदर वैद्यकीय तपासणी पथकामार्फत शाळा व अंगणवाडयामध्ये जावून विद्यार्थ्यांची व बालकांची आरोग्य तपासणी करणार आहेत. सदरचे अभियान पुढील दोन महिने या कालावधीत राबविण्यात येणार आहे याबाबत माहिती दिली.
तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की, “ बाल सुरक्षा अभियान – जागरुक पालक सुदृढ बालक ” अभियानांतर्गत आपल्या पाल्यांची शाळेमधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी. याकरीता वैद्यकीय विभागामार्फत शाळांमध्ये आरोग्य तपासणीचा दिवस निश्चित करुन देण्यात येईल. आरोग्य तपासणी दिवशी विद्यार्थी शाळेत/अंगणवाडी मध्ये उपस्थित राहतील याची पालकांनी कृपया दक्षता घ्यावी.


















