न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रुवारी २०२२) :- चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने २० स्टार प्रचारकांची नावे प्रदेश समितीच्या वतीने जाहिर केली आहेत. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांचाही समावेश आहे.
चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश समितीच्या वतीने सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना २० स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य, ग्रामीण आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करुन घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ,माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार फौजिया खान, माजी मंत्री जितेंद्र अव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, आमदार निलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, सुभान अली शेख यांचा समावेश आहे.


















