- वाकडच्या ‘रिदम’ हाऊसिंग सोसायटीची पीएमआरडीएकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- बेकायदेशीर झोपड्यांवर पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वाकड येथील रिदम हाऊसिंग सोसायटीधारकांनी दिला आहे.
वाकड येथील सर्व्हे क्रमांक २१०, २०८, २०९ येथील मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीर झोपडीधारकांचा ताबा असून, त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा आरोप येथील रिदम हाऊसिंग सोसायटीधारकांनी केला आहे. या झोपड्यांवर वारंवार कारवाईची मागणी करूनही पीएमआरडीएकडून टाळाटाळ होत असल्याने, प्रशासनाला जाग येण्याकरता आंदोलन करण्याचा इशारा वाकड, काळेवाडी फाटा येथील रिदम हाऊसिंग सोसायटीने दिला आहे.
दरम्यान, अभिजित गरड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोसायटीच्या बाजूला पीएमआरडीएचा मोकळा भूखंड आहे. त्यावर बेकायदेशीरपणे झोपड्या वसल्या आहेत. या परिसरात स्वच्छता राखली जात नाही, सर्व कचरा नाल्यामध्ये आणि उघड्यावर टाकला जातो. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असल्याचे सोसायटीधारकांचे म्हणणे आहे.


















