न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- ओम साई ट्रान्सपोर्ट या दुकानाचे शटर उचकटुन अज्ञात चोरटयाने दुकानात प्रवेश केला. दुकानातील एक लाखांची रोकड चोरुन नेली.
ही घटना (दि. ८) रोजी रात्री १०.३० ते (दि. ९) रोजी सकाळी ७.०० वा. दरम्यान बालाजी लॉ कॉलेज समोर, औंध-रावेत बी.आर.टी. रोड, ताथवडे येथे घडली.
फिर्यादी अविनाश गोविंद कांबळे (वय ३५ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. श्रीनंदा क्लासिक हौसिंग सोसायटी, पाठिमागे, लिंक रोड, श्रीनगर, रहाटणी) यांनी आरोपी अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी १२६ / २०२३ भा.दं.वि. कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.












