न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२३) :- भरधाव वेगाने आरोपीने रिक्षा (एमएच१४एचएम१८४८) चालविली. फिर्यादीच्या (एमएच१४एचएम८०८४) रिक्षाला उजव्या बाजुने धडक दिली. त्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच रिक्षाचे नुकसान झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ७) रोजी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारस प्रकाश दुकानासमोर, विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी कैलास बबन शिंदे (वय ३३ रा. बौद्धनगरजवळ, विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी) यांनी आरोपी रिक्षाचालक कुमार दिलीप घाटिये (वय ३५ रा. विठ्ठलनगर, नेहरुनगर पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी १७४/२०२३ भा.द.विकलम २७९, ३३७,४२७, मो.वा.का. कलम १८४,१३४/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












