न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनद्वारे (ईव्हीएम) २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
ईव्हीएम मशिनमुळे कोणाला किती मतदान कोणत्या भागातून झाले हे स्पष्ट समजते. मतदानाची गुप्तता भंग होते. ज्या भागांतून कमी मतदान झाले त्या भागात विजयी लोकप्रतिनिधीकडून विकासकामे राबविताना भेदभाव केला जाऊ शकतो.
त्यामुळे मतदान ईव्हीएमऐवजी कागदी मतपत्रिकेवर घेण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभेच्या सात अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.












