- महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार प्रमुखपदी जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचार प्रमुखपदी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज भोईर यांना निवडीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे गेल्या वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. चिंचवड पोट निवडणुकीसाठी तेही प्रबळ इच्छुक होते. मात्र पक्षाने ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली.
आता नाना काटे यांच्या प्रचाराची धुरा पक्षाने भोईर यांच्या शिरावर दिली आहे. त्यामुळे नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी भोईर यांना आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे.
















