न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- अॅक्टीवा (एमएच१४एचसी६२३२) वरून जात असताना फिर्यादी हे गाडी चालवित होते. त्यांचा मित्र पाठीमागील सिटवर बसला होता. समोरून आलेल्या आरोपी कार (एमएच१४जेएच३९११) वरील चालकाने त्याची कार भरधाव वेगाने, हयगयीने, अविचाराने चालवुन फिर्यादीच्या दुचाकीला डाव्या बाजुने येवुन धडक दिली.
आरोपी अपघातस्थळी न थांबता पुढे निघुन गेला. अपघातात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपरास, पंजाजवळ, डाव्या गुडघ्याखाली किरकोळ जखम झाली असुन, मित्र अरबाज याच्या डाव्या पायाच्या नडगीस व डाव्या हाताच्या पंजास मार लागला आहे. ही घटना (दि. १०) रोजी रात्री १.३० ते १.४५ वाजेच्या सुमारास राज तापकीर यांच्या घराजवळील रस्त्यावर, तापकीरनगर, काळेवाडी येथे घडली.
फिर्यादी ओंमकार अशोक खुंटे (वय २१ वर्षे धंदा नोकरी, रा. श्रीधन अपार्टमेंट फेज-२, फ्लॅट नं.४०४, वाघीरे कॉलनी, पिंपरीगांव) यांनी आरोपी कार नंबर (एमएच१४जेएच३९११) वरील चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी १२८/२०२३ भादवी कलम २७९, ३३७, ४२७ मो. वा. का. कलम १८४,११९ / १७७,१३२ (१) (क) नुसार आरोपी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















