न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- वाकड येथील शिवार गार्डन हॉटेलच्या पाठीमागे अन्या बॉडी स्पा मसाज सेंटरमध्ये पिडीत महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायाकरिता प्राप्त करुन घेऊन त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी (दि. ९) सायं ७.१० वाजेच्या सुमारास मसाज सेंटरवर कारवाई केली. महिला आरोपी, प्रतिक कोलम (वय ४८ वर्ष, रा. कोरेगांव पार्क पुणे), प्रियो सोयम मिताई (वय ३० वर्ष रा. अन्या बॉडी स्पा सेंटर, वाकड), राज टंकाबहादुर क्षेत्री (वय २२ वर्ष, व्यवसाय अन्या स्पा मॅनेजर, रा आनंद पार्क, लेन नं -६, आँध) यांना ताब्यात घेतले.
वाकड पोलिसांनी आरोपी विरोधात १२७/२०२३, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४, ५ भादवि कलम ३७० (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















