- पाच एकरातल्या क्रिकेट ग्राउंडची नासधूस; दीड कोटींचे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- ५ एकर क्षेत्रात फिर्यादीने उच्च प्रतिच्या ग्रासमध्ये क्रिकेट खेळाचे ग्राऊंड बनविले. आपसात संगनमत करुन फिर्यादीच्या क्रिकेट ग्राऊंडमध्ये आरोपी बेकायदा गेले. तेथील साहित्य, लॉक तोडुन फिर्यादीच्या साहित्याची चोरी केली. ग्राऊंडचे नुकसान केले. ग्राऊंडमध्ये फिर्यादीवर दगड लाठीचा मारा केला. हातपाय तोडुन, जिवे मारु व तुमचा मुळशी पॅटर्न करुन विषय संपवुन टाकु, अशी धमकी दिली. आरोपींनी ग्राऊंडमधील सामान चोरुन नेत फिर्यादीचे १ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ७/०६/२०१९ ते आजपर्यंत) बोडकेवाडी, माण येथे सर्व्हे नंबर १८७ मध्ये घडली. फिर्यादी विकास अण्णासाहेब एकशिंगे (वय ४५ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. कृष्णानगरी कॉलनी, नखातेवस्ती, श्रीनगर, रहाटणी) यांनी आरोपी प्रभाकर दगडु बोडके, संताजी दगडु बोडके, राजाराम दगडु बोडके, प्रविण अरुण बोडके, सिताराम सोपान बोडके, मैना अरुण बोडके, हरिश भगवान बोडके, निलेश भगवान बोडके, निखिल पांडे, निखिल राजाराम बोडके, आनंद प्रभाकर बोडके (सर्व रा. बोडकेवाडी, माण) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ११६ / २०२३ भा.दं.वि. कलम ४०६, ४१८, ४२०, ४२६, ४४७, ४५४, ४५७, ३८०, ५०४, ५०६, ५०७, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















