- १४ नोंदणीकृत कामगारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- कंपनीमध्ये अनलोडींगसाठी येणाऱ्या वाहनांच्या ड्रायव्हरकडून आरोपींनी माल खाली करण्यासाठी मोबदला रक्कम म्हणून रोख स्वरूपात आणि गुगल पे व्दारे प्रत्येक गाडीमागे २०० ते ३०० रूपये याप्रमाणे दररोज अनलोडींगकरीता येणा-या गाडयापैकी ५ ते १० गाडयांच्या ड्रायव्हरकडून दिवसाला १,००० ते १,५०० प्रमाणे महिन्याल २५,००० ते ३७,५०० रुपये, असे सुमारे ४ लाख ते ६ लाख रुपयांची रक्कम खंडणी स्वरूपात घेतली.
ट्रान्सपोर्ट आर. एस, ट्रान्सपोर्ट सितारगंज, उत्तराखंड, आर साई ट्रान्सपोर्ट, सितारगंज उत्तराखंड, तिरूपती लॉजीस्टीक होसुर, कनार्टक व तिरूपती लॉजीस्टीक मुंबई, रजनी ट्रान्सपोर्ट बेंगलोर, अर्थव ट्रान्सपोर्ट रांजणगाव, अथर्व ट्रान्सपोर्ट भिवंडी मुंबई व इतर ट्रान्सपोर्ट यांच्या ड्रायव्हरकडून ही रक्कम घेतली. हा प्रकार ऑक्टोबर २०२१ ते १०/२/२०२३ पर्यंत खराबवाडीतील टोल इंडीया लॉजीस्टीक प्रा. लि. या कंपनीत घडला.
फिर्यादी अभिजीत धनंजय कुलकर्णी (वय ४१ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. लिटील हार्ट को ऑपरेटीव्ह हौसींग सोसायटी, तळेगाव दाभाडे) यांनी आरोपी प्रभाकर रामदास तळेकर (रजिनं ५२८५, वय ३४ वर्ष रा भोसे, ता खेड जि पुणे), कृष्णा बाबाजी चौधरी (रजि.नं. ५२८७ वय ३६व र्षे रा. पाबळ), राजेश किसन गुळवे (रजि.नं. ६४५५, वय ४१ वर्षे, रा. जुन्नर), गणेश शिताराम जाधव (रजि.नं. ६४५६, वय ४४ वर्षे रा. भोसरी), मोहन कोंडीबा थोरवे (रजि.नं. ७२१३ वय ३५ वर्षे रा. खेड), प्रसाद जालींदर कदम (रजि.नं. १६५८९, वय २६ वर्षे रा भोसरी), स्वप्नील दिपक टेमकर (रजि.नं. ७६९८, वय ३७ वर्ष रा. नारायणगाव), बाळासाहेब सिताराम गाढवे (रजि नं. ८०४२ वय ४३ वर्षे, रा. खेड), संजय यशवंत नाईकरे (रजि. नं. ८४३०, वय ४४ वर्षे रा. खेड), प्रशांत बबन तळेकर (रजि. नं. ८९५५ – मुकादम, वय ३८ वर्षे रा. चाकण), नंदकुमार रामदास वायाळ (रजि. नं. ८१५६, वय ३८ वर्षे रा. चाकण), नवनाथ घोडीभाऊ खंडागळे (रजि.नं. १२११९, वय ३६ वर्षे रा. चाकण), मोहन दौलत बोंबे (रजि.नं. १२४६८, वय २८ वर्ष, रा. पाबळ, ता. खेड), सोमनाथ वसंत बोंबे (रजि.नं. १२८०१, वय २९ वर्षे रा. पाबळ, ता. खेड) अशा टोळी क. ४०१ मधील एकूण १४ नोंदणीकृत माथाडी कामगारांविरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआसडीसी पोलिसांनी आरोपींविरोधात २३/२०२३ भा.द.वी. ३८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.