न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- हुंड्यामध्ये फ्लॅट, चारचाकी गाडी दिली नाही. तसेच फिर्यादीच्या पतीला कंपनी टाकुन दिली नाही. या कारणावरून आरोपींनी संगनमत करीत फिर्यादीला शारीरीक व मानसिक त्रास दिला. तसेच आरोपी पतीने दारू पिऊन फिर्यादीस घरातील बेडरूममध्ये वारंवार बंद करीत मारहाण केली. पतीने फिर्यादीची इच्छा नसतांना जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिक संभोग केला. फिर्यादीने विरोध केला असता आरोपीने फिर्यादीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मामे सासरा आरोपीने पती घरी नसताना फिर्यादीचा विनयभंग केला. फिर्यादीकडे संभोगाची इच्छा व्यक्त केली, असे या फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १९/०५/२०२२ ला दुपारी ४.०० वाजता ते दि. २८/१२/२०२२ ला रात्री १०.०० वाजता फ्लॅटनं. ३९३, रोहन इंटरप्रायजेस, म्हाळसांकात शाळेच्या समोर, से.नं. २७ (अ), म्हाळसाकांत चौक, आकुर्डी व फ्लॅट नं. ३०१, शांताई हेरीटेज, गंगानगर, आकुर्डी येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी पती रोहन सुनिल हिमने (वय २७ वर्षे), सासु, (दोन्ही रा. फ्लॅट नं. ३९३, रोहन इंटरप्रायजेस, म्हाळसांकात शाळेच्या समोर, से.नं. २७ (अ), म्हाळसाकांत चौक, आकुर्डी), मामे सासरा तेजस भीमराव नौकुडकर (वय ४० वर्षे रा. फ्लॅट नं. ८, पहिला मजला, रेणुका अपार्टमेंट, फतेलाला पाथ, एरंडवणे) या तिघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ९७/२०२३ भा.दं.वि कलम ४९८ (अ), ३७७, ३५४, २९४, ३२३, ५०४, ५०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.