न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कचरा व्यवस्थापन, पाणीप्रश्न, सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन, पवनामाईचे पनरुज्जीवन यासह मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सांगितले. उच्चशिक्षित असलेले कलाटे यांचे मतदारसंघाबाबतचे सर्वांगिण विकासाचे ‘व्हिजन’ मतदारांना भावत आहे. त्यामुळे राहुलदादालाच आमदार करणार अशा प्रतिक्रिया मतदार देतात.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला राहुल कलाटे शिट्टी चिन्हावर सामोरे जात आहेत. कलाटे नागरिकांच्या वैयक्तीक गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या पदयात्रांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात, जल्लोषात स्वागत केले जाते. राहुल कलाटे नागरिकांसमोर चिंचवडच्या विकासाचे ‘व्हिजन’ मांडतात. कलाटे यांनी दुरदृष्टी ठेवून मांडलेले ‘व्हिजन’ मतदारांना भावत आहे. कलाटे यांच्याकडे चिंचवडचा सर्वांगीण विकास करण्याची धमक, ताकद, क्षमता असल्याचे मतदार सांगतात. कलाटे यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राज्यातील सर्वात मोठा चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे. मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून म्हणजेच 2009 पासून चिंचवडचा सर्वांगीण विकास झाला नाही. काही टप्प्यातच कामे झालेली दिसतात. त्यामुळे विकास कामात भेदभाव न करणारा, चिंचवडचा सर्वांगीण विकास करणारा, उच्चशिक्षित, प्रश्नांची जाण असनारा राहुल कलाटे यांच्यासारखा आमदार चिंचवडच्या जनतेला हवा आहे. कलाटे यांच्याकडे आशादायक नेतृत्व म्हणून मतदार बघतात. आता उच्चशिक्षित कलाटे यांनाच चिंचवडचा आमदार करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
राहुल कलाटे म्हणाले, चिंचवड मतदारसंघात नियोजनशून्य पद्धतीने बीआरटी मार्ग उभारले आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या आहे. हिंजवडी, वाकड, पिंपळेसौदागर, नाशिक फाटा भोसरी, चाकण असा मार्ग चिंचवडची वाहतूक धमनी होवू शकते. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. चिंचवडमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांची मोठी संख्या आहे. कर वसुतील नियोजन शून्यता आहे. त्यामुळे मोठा सोसायट्यांना नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे यापुढे विनाकारण राजकीय हेतूने त्रास दिला जाणार नाही. शहरात 6 हजार 500 हौसिंग सोसायट्या आहेत. या सोसायट्यांचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे. सर्व नागरिकांना दरडोई 135 लीटर प्रति दिन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. उद्योजकता इनक्युबेशन हबची निर्मिती करुन उद्योजकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल.


















