न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) २५ खाटांचा तिसरा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे.
तिस-या विभागाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयू वॉर्डमुळे चिंताजनक रुग्णांवर रुग्णालयात उपचार करणे सोईचे होणार आहे, असे वायसीएमएच रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांनी सांगितले.











