न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च) :- ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा’ च्या अध्यक्षपदी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांची राज्य सरकारने नुकतीच नियुक्ती केली आहे.
त्यांची जनविकास युवा मंचाचे अध्यक्ष सचिन पांढरकर यांनी नुकतीच भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी रामभाऊ पांढरकर, प्रमोद माने, यूनिस पगडीवाले आदी उपस्थित होते.











