न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १४ मार्च) :- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसनं आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्रात एकूण 22 जागा लढविण्याचा विचार असून, त्यापैकी राष्ट्रवादी किती लढणार आणि काँग्रेस किती? याबाबचा अद्याप निर्णय व्हायचा असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण १२ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यात हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीनं स्वाभिमानी पक्षासाठी जागा सोडली आहे. या यादीत नगरच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. उर्वरित यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. विशेष, म्हणजे पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करुनही या यादीत त्यांचा व शिरुरसाठी इच्छुक अमोल कोल्हे यांचा या यादीत समावेश नाही.
यादीतील नावे पुढीलप्रमाणे :-
१) सुप्रिया सुळे-बारामती
२) सुनील तटकरे-रायगड
३) उदयनराजे भोसले-सातारा
४) आनंद परांजपे- ठाणे
५) बाबाजी पाटील-कल्याण
६) धनंजय महाडीक-कोल्हापूर
७) मोहम्मद फैजल-लक्षद्विप
८) संजय दीना पाटील-ईशान्य मुंबई
९) राजेंद्र शिंगणे-बुलडाणा
१०) गुलाबराव देवकर-जळगाव
११) राजेश विटेकर-परभणी











