न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांचा मुलगा कौशिक राजू धर (वय, रा. थेरगाव) याने नववीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
त्याचा आज गुरुवार (दि. १४) रोजी दुपारी २:१५ वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तो आकुर्डीतील एका शाळेत नववीमध्ये शिकत होता. संत तुकारामनगर येथील अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अशोक शीलवंत यांचा नातू होत. त्याच्या अकाली जाण्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.











