न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च) : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने आज शुक्रवार (दि. १५) रोजी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. अपेक्षे प्रमाणे या यादीत मावळ लोकसभेसाठी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली आहे.
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नाशिकमधून समीर भुजबळ, दिंडोरीतून धनराज महाले तर बीडमधून बजरंग सोनवणे यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत नगरच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.











